राजाराम मुकणे (जुलै ५, इ.स. १९४० - ) हे तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागातील एक समाज सेवक व लोकप्रिय राजकीय नेते आहेत. आदिवासी भागातील जनतेच्या उन्नतीसाठी ते गेली ४० वर्ष कार्यरत आहेत.. दलित समाजावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी १९६८ पासून विविध वृत्तपत्रांत लिखाण करून सातत्याने आवाज उठवला आहे. ते व्यवसायाने वकील असून १९७२ पासून ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तसेच अन्य जाती धर्माच्या गरीब जनतेला मोफत कायदेशीर साहाय्य पुरवितात.
मुकणे यांचा जन्म कै. पांडुरंग काळूजी मुकणे आणि अनसूया पांडुरंग मुकणे यांच्या पोटी जव्हार संस्थानामध्ये झाला.राजाराम मुकणे हे दुसऱ्या मार्तंडराव महाराज मुकणे (पाचवे विक्रमशहा) यांनी १ सप्टेंबर १९१८ रोजी स्थापन केलेल्या जव्हार नगरपालिकेचे बिनविरोध निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष आहेत. ते भारताचे उप-पंतप्रधान बाबू जगजीवनराम यांनी स्थापन केलेल्या भारतीय दलित वर्ग संघाचे (इंग्रजी: All-India Depressed Classes League)चे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी पद भूषविले आहे.
राजाराम मुकणे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.