राजा गोसावी - पूर्ण नाव - राजाराम शंकर गोसावी (जन्म:kuroli siddheshwar, Satara मार्च २८, १९२५ - ०१ मार्च १९९८) हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. राजा गोसावींना विनोदाचा राजा म्हणत. मराठीचे ते डॅनी के होते. त्याचं मूळ गाव सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील कुरोली सिद्धेश्वर हे होते. राजा गोसावी यांचे धाकटे बंधू बाळ गोसावी हेही नाट्यअभिनेते होते. नाट्यअभिनेत्री भारती गोसावी या बाळ गोसावी यांच्या पत्नी होत.
राजा गोसावी हे मास्टर विनायकांच्या घरी ते घरगड्याचे काम करीत. प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्त्यांनी आधी ऑफिसबॉयचे व नंतर सुतारकाम केले पुढे मेक-अप, प्रकाश योजना आदी खात्यांत काम करत ते ’एक्स्ट्रा’ नट बनले. पुढे दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते ’प्रॉम्प्टर’ झाले. त्यांना ’भावबंधन’ या नाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली. तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका. नंतर ते पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात चित्रपटाची तिकीटबारीवर तिकिटे विकायचे काम करू लागले ,त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट ’अखेर जमलं’ आणि ’लाखाची गोष्ट’ जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागले, तेव्हाही राजा गोसावींनी आपल्याच चित्रपटाची तिकिटे विकली होती.
राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातीला कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत.
राजा गोसावी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.