राजर्षी शाहू महाविद्यालय (लातूर)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

राजर्षी शाहू महाविद्यालय महाराष्ट्राच्या लातूर शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. शिव छत्रपती शिक्षण संस्था ही संस्था हे महाविद्यालय चालवते. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९७० साली करण्यात आली आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान या तिनही विद्याशाखेचे शिक्षण दिले जाते. लातूर पॅटर्न मुळे हे महाविद्यालय कमी वेळेत नावाला आले. मुख्यतः विज्ञान शाखेसाठी हे महाविद्यालय निवडण्यात येते. राजर्षी शाहू लातूर हे मराठवाड्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात विविध सोयी सुविधा आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →