राजकुमार रणबीर सिंग (१९३० - २७ जानेवारी २००६) हे आर.के. रणबीर सिंग या नावानेही ओळखले जाणारे मणिपूर राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. ते मणिपूर राजघराण्यातील होते. १९९० ते १९९२ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. ते मणिपूर पीपल्स पार्टीचे सदस्य म्हणून १९९० च्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत केशमथोंग येथून विधानसभेवर निवडून आले.
त्यांनी मणिपूर दारू बंदी कायदा, १९९१ आणला ज्याने मणिपूर राज्यात दारूवर बंदी घातली. मार्च २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
दीर्घ आजाराने २७ जानेवारी २००६ रोजी त्यांचे निधन झाले.
राजकुमार रणबीर सिंह
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!