हमीर हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. याला हंबीर असेही म्हणतात. रागचंद्रोदय या ग्रंथात हमीरचा उल्लेख आहे. केदारश्याम आणि कामोद हे हमीरचे समप्रकृती राग आहेत.
कर्नाटकी संगीतातल्या हमीर कल्याणी या रागाशी उत्तर हिंदुस्तानी हमीरशी गल्लत होऊ नये. हमीर कल्याणचे सांम्य केदार रागाशी आहे.
डागर बंधू, गुंदेच्या बंधू हमीरमध्ये ध्रुपद गातात. कृष्णराव शंकर पंडित, नारायणराव व्यास, डी.व्ही. पलुस्कर, गजाननबुवा जोशी, उल्हास कशाळकर, वीणा सहस्रबुद्धे आदी ग्वाल्हेर घराण्यातील गायकांचा हमीर हा आवडता राग आहे.
राग हमीर
थोडक्यात पण महत्त्वाचे.