राग बिलावल

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

राग अल्हैया बिलावल हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे.

राग अल्हैया बिलावल



राग परिचय –



थाट-बिलावल मेलकर्ता धीरशंकराभरण

स्वर- सर्व स्वर शुद्ध फक्त अवरोहात कोमल निषादाचा थोडा वापर केला जातो; सा, रे, ग, म,प, ध, नि,नि ;

गांधार व निषाद हे स्वर वक्र असतात;, जाती - वक्र संपूर्ण; उत्तरांग प्रधान

वादी - ध , संवादी - ग;

आरोह - सा, रे, ग रे, ग प, ध,नि ध,नि सां;

अवरोह - सां ,नी ध प, ध नि ध प, म ग , म रे, सा;

पकड - ग रे, ग प, ध,नि सां;

गानसमय - सकाळचा पहिला प्रहर

रागांग- बिलावल; अल्हैया बिलावल हा बिलावल थाटाचा आश्रय राग आहे.



विशेष स्वर समूह- ग रे, ग प, म ग, म रे, सा; पनी धनी ; सां ध प म ग; प ध ग प म ग ; ग मनी ध प; सां धनी प; धनी ध प. म ग, म रे, सा



विशेष माहिती - बिलावल अंगाचा समावेश करून इतर काही रागांच्या मिश्रणातून काही राग निर्माण झाले आहेत - जसे; यमनी बिलावल , देवगिरी बिलावल, शुक्ल बिलावल, सरपरदा बिलावल, कुकुभ बिलावल, नट बिलावल .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →