रवींद्र दिनकर बापट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डॉ. रवींद्र दिनकर बापट, अर्थात रवी बापट (२ जून, इ.स. १९४२ - हयात) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये चार दशके प्राध्यापक आहेत (इ.स. २०१२पर्यंत) आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.

रवी बापटांचे वडील बालाघाटला सिव्हिल सर्जन होते. भाषावार प्रांतरचनेनंतर ते चांद्याला आले आणि सहा वर्षे राहिले. जेव्हा त्यांची मुंबईला बदली झाली तेव्हा वर्तमानपत्रात ’चांद्याचा देव चालला’ अशा मथळ्याचा अग्रलेख छापून आला होता. मुंबईत ते कामगार विमा योजनेचे प्रमुख होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ४०० विमा डॉक्टरांना गैरवर्तणुकीसाठी काढून टाकले आणि दोघांवर फौजदारी खटला भरला. पैकी एक वशिल्याने सुटला आणि दुसरा तुरुंगात गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →