रविशंकर शुक्ला (२ ऑगस्ट १८७७ - ३१ डिसेंबर १९५६) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते होते. २७ एप्रिल १९४६ ते २५ जानेवारी १९५० पर्यंत ते मध्य प्रांत आणि वऱ्हाडचे प्रधानमंत्री होते. नंतर मध्य प्रदेश राज्याच्या निर्मिती नंतर ते २६ जानेवारी १९५० ते ३१ डिसेंबर १९५६ मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. पदस्थ असतांनाच त्यांचा ३१ डिसेंबर १९५६ रोजी मृत्यू झाला. त्यांनी मध्य प्रांत आणि वऱ्हाडमधून भारताच्या संविधान सभेचे सदस्य म्हणूनही काम केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रविशंकर शुक्ला
यामागील विज्ञान आणि इतिहास.