रझाकर (उर्दू: رضا کار) हा एक अरबी शब्द आहे ज्याचा शाब्दिक अर्थ 'स्वयंसेवक' असा आहे. हा शब्द उर्दू भाषेत सुद्धा वापरला जातो. दुसरीकडे बांगलादेशात, रझाकार हा शब्द हीन भावनेतून वापरला जातो, तेथे ज्याचा अर्थ 'देशद्रोही' किंवा यहूदा असा होतो.
हैदराबादचा शेवटचा निझाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली एक क्रूर अर्धसैनिक दल स्थापन केले होते. पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार हे या दलाचे उद्दीष्ट होते. या दलास त्यावेळेस रझाकार असे संबोधले जात असे. हैदराबादच्या या रझाकार दालने तेथील बहुसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. अत्याचाराची तुलना क्रूरकर्मा हिटलरच्या नाझी सैन्याशी केली जाते. त्यामुळे आजही मराठवाडा आणि तेलंगणात या शब्दाकडे शिवी या भावनेने पाहिल्या जाते.
रझाकार (हैदराबाद)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.