रघुनाथ रामचंद्र किणीकर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रघुनाथ रामचंद्र किणीकर

रघुनाथ रामचंद्र किणीकर तथा रॉय किणीकर (इ.स. १९०७ - ५ सप्टेंबर, इ.स. १९७८) हे मराठी भाषेतील कवी, नाटककार, पत्रकार होते. त्यांचे वडील वकील होते. रॉय किणीकरांनी आयुष्यातील बहुतांश काल कर्नाटकातील गुलबर्गा येथे घालवला. पुढचा काही काळ त्यांनी पुण्यात आणि औरंगाबादेत व्यतीत केला.

रॉय किणीकर हे औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक होते. रविवार पुरवणीत ते काहीना काही ललित लेखन करीत असत.

रॉय किणीकर यांनी काही नाटकांत भूमिका केल्या आहेत. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेच्या मदतीसाठी झालेल्या आचार्य अत्रे यांच्या ’घराबाहेर’ नाटकात त्यांनी काम केले होते. त्यांनी औरंगाबाद नभोवाणीसाठी काही श्रुतिकाही लिहिल्या होत्या. त्यांच्या नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग होत असत. रॉय किणीकरांच्या ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाचे त्याकाळी १९ प्रयोग मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नाट्य विभागाने केले होते. साहाय्यक नाट्यदिग्दर्शक म्हणून ते अभिनय, संवादफेक अशा गोष्टी सहजपणे समजावून सांगत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →