मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू (११ नोव्हेंबर, इ.स. १९११:माणगाव, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - ७ मे, इ.स. १९९१) हे एक मराठी कवी होते. लोककवी मनमोहन या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते. मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपणनाव होते. त्यांनी अंदाजे ५,००० मंगलाष्टके लिहिली, भविष्ये लिहिली आणि याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि लघुकथाही लिहिल्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केली आहे. त्यांच्या आठवणी सांगणारे आठवणीतील मनमोहन (लेखिका : संध्या देवरुखकर) हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ला प्रकाशित झाले. या पुस्तकात भा.द. खेर, रमेश मंत्री, रॉय किणीकर, प्रा.शंकर वैद्य, शं.ना. नवरे वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. जयवंत दळवी यांनी नातूंचे वर्णन चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस असे केले आहे.
मनमोहन नातू यांचे निधन ७ मे १९९१ या दिवशी झाले.
मनमोहन नातू
थोडक्यात पण महत्त्वाचे.