योकोहामा (जपानी: 横浜; उच्चार ) हे जपान देशामधील एक विशेष दर्जा असलेले शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते कनागावा प्रांताची राजधानी आहे. २०१२ साली ३६.९८ लाख लोकसंख्या असलेले योकोहामा हे जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर (तोक्यो खालोखाल) तर सर्वाधिक लोकसंख्येची महापालिका आहे. तोक्यो महानगराचा भाग असलेले योकोहामा नवीन तैपैखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उपनगर मानले जाते.
योकोहामा जपानमधील एक प्रमुख बंदर असून निसान ह्या बहुराष्ट्रीय मोटार उत्पादन कंपनीचे मुख्यालय येथेच आहे. योकोहामामधील निसान मैदान हे जपानमधील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम असून २००२ फिफा विश्वचषकाचा अंतिम फेरीचा सामना येथे खेळवला गेला होता. तसेच फिफा क्लब विश्वचषकाचे आयोजन योकोहामाने २००५-२००८ व २०११-२०१२ दरम्यान केले होते.
योकोहामा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?