युएफा युरो २००८ किंवा युरो २००८ ही १३वी युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होती. दर चार वर्षांनी युरोपमधील देश ही स्पर्धा खेळतात. २००८ची स्पर्धा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये जून ७, इ.स. २००८ ते जून २९, इ.स. २००८ दरम्यान खेळण्यात आली. व्हियेनाच्या अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉनमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने जर्मनीला १-० ने हरवून अंजिक्यपद मिळवले. १९९६ च्या जर्मन संघानंतर स्पेनचा हा संघ एकही सामना न हरता अजिंक्यपद मिळवलेला पहिला संघ होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युएफा यूरो २००८
थोडक्यात पण महत्त्वाचे.