यादगीर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

यादगीर

यादगीर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील यादगीर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. यादगीर शहर भारतातील कर्नाटक राज्याच्या ईशान्य भागात बंगळूरपासून ५०० किमी तर हैदराबादपासून २०० किमी अंतरावर आहे. २०११ साली यादगीरची लोकसंख्या ७४ हजार होती.

यादगीर हे मुंबई–चेन्नई रेल्वेमार्गावरील स्थानक असून येथे दररोज कर्नाटक एक्सप्रेस, दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस, रायलसीमा एक्सप्रेस इत्यादी गाड्या थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →