मधुकर श्रीपाद माटे हे पुरातत्त्व, इतिहास, कला, वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प ह्या विषयांचे अभ्यासक होते, ह्या विषयांवर मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये त्यांनी लेखन केले.
मराठी अस्पृश्योद्धारक लेखक श्री.म. माटे यांचे ते चिरंजीव होते.
मराठा वास्तूशिल्प ह्या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी १९५७ साली पीएच्.डी पदवी प्राप्त केली.
ते डेक्कन कॉलेज पुणे येथे पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
२३ एप्रिल २०१९ रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.
म.श्री. माटे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.