म.ना. अदवंत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

महदेव नामदेव अदवंत (जन्म : ६ जून, १९१४) हे एक मराठी लेखक होते. ते जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात संस्कृत व मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचे ’पैंजण’ हे पुस्तक भारत सरकारने यू.पी.एस.सी.च्या अभ्यासासाठी नेमले होते.

’मराठी की प्रतिनिधी हास्य कहानियॉं’ या हिंदी पुस्तकात संपादक डॉ. शान्तिस्वरूप गुप्त यांनी म.ना. अदवंत यांच्या एका विनोदी कथेचा ’पेचीला प्रसंग’ या नावाचा हिंदी अनुवाद समाविष्ट केला आहे.

म.ना. अदवंत यांनी मराठी विश्वकोशावर गो.गं. लिमये, शं.दा. पेंडसे आदी लेखकांचा परिचय करून दिला आहे.

म.ना. अदवंत यांच्या नावाचे महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे ’म.ना. अदवंत प्राथमिक विद्या मंदिर’ आहे. या शाळेने ‘म.ना अदवंत स्मरणग्रंथ’ प्रकाशित केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →