गो.गं. लिमये

या विषयातील रहस्ये उलगडा.

कॅ. गोपाळ गंगाधर लिमये (जन्म : पुणे, २५ सप्टेंबर, इ.स. १८८१; - - पुणे, नोव्हेंबर १९, १९७१) हे एक मराठी विनोदी लेखक होते.

गो.गं. लिमये यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावात आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजातून सुवर्णपदकासहित त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली आणि त्या जोरावर ते लष्करात दाखल झाले. इ.स. १९१८ ते १९२१ या काळात त्यांनी सैन्यदलात कॅप्टनच्या हुद्द्यावर नोकरी केली. तेथून सेवानिवृत्ती घेतल्यावर कॅ.लिमये यांनी मुंबई महापालिकेत आरोग्याधिकारी म्हणून काम केले.

१९३७ साली मुंबईत स्थापन झालेल्या फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाचे ते संस्थापक सदस्य होते.

लिमये यांनी इ.स. १९१२पासून मासिक मनोरंजनमध्ये कथा लिहून मराठी कथालेखनाचा प्रारंभ केला. ते मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण विनोदी लेखक समजले जात.

प्रवासवर्णन, आत्मनिवेदन अशा अनेक माध्यमांचा विनोदासाठी लिमये यांनी मोठ्या कुशलतेने उपयोग करून घेतला. त्यामुळे त्यांच्या विनोदी लेखनात लक्षणीय नाट्यमय विविधता आलेली आहे.

कॅ. लिमये यांनी युद्धाच्या अनुभवांवर कथा लिहून मराठीत युद्धकथांची लक्षणीय भर घातली. ’सैन्यांतील आठवणी’ हे लिमये यांचे आत्मनिवेदनात्मक पुस्तक. पेशावर, दारेसलाम, बगदाद इत्‍यादी ठिकाणच्या त्यांच्या आठवणी त्यांनी त्यात मनोरंजक पद्धतीने सांगितल्या आहेत. ह्यांशिवाय विख्यात फ्रेन्च नाटककार मोलियर ह्याच्या काही नाटकांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. वैद्यक, शुश्रूषा अशा विषयांशी संबंधित पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →