मराठी चित्रपट/नाटक/दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि त्यांतील कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि ’कोहिनूर’ दरवर्षी ’कोहिनूर मटा सन्मान’ पुरस्कार जाहीर करतात.
इ.स. २०१३ सालचे कोहिनूर मटा पुरस्कार मिळालेले पुरस्कारार्थी
चित्रपट विभागात ' धग ', नाटक विभागात ' प्रपोजल '; तर टीव्ही विभागात ' गुंडा पुरुष देव ' अव्वल ठरले आहेत. ' जयश्री मोशन पिक्चर्स 'ची निर्मिती असलेल्या ' धग ' ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री, साहाय्यक अभिनेता, पटकथा, बालकलाकार अशा सर्वाधिक सहा आघाड्यांवर बाजी मारली. नाटक विभागात ' प्रपोजल ' ने सर्वोत्कृष्ट निर्मितीसह सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, नेपथ्य, प्रकाशयोजना , सर्वोत्कृष्ट संगीत अशा पाच आघाड्यांवर बाजी मारली. तर, ' गुंडा पुरुष देव ' या मालिकेने टीव्ही विभागात सर्वाधिक पुरस्कारांवर आपली नाममुद्रा उमटवली.
म.टा. सन्मान
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.