येस बॉस हा १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला अझीझ मिर्झा दिग्दर्शित हिंदी भाषेतील प्रणय-हास्य चित्रपट आहे ज्यामध्ये आदित्य पंचोली, शाहरुख खान आणि जुही चावला मुख्य भूमिकेत आहेत. रतन जैन निर्मित, हा चित्रपट मायकेल जे. फॉक्स अभिनीत फॉर लव्ह ऑर मनी (१९९३) या चित्रपटावर आधारित आहे.
येस बॉस हा १८ जुलै १९९७ रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर व्यावसायिक यश मिळवले व जगभरात २३ कोटी (US$५.११ दशलक्ष) कमाई केली. प्रदर्शित होताच चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळाला; त्यातील विनोद, गीत आणि कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा झाली, परंतु पटकथा आणि गतीबद्दल टीका झाली.
४३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, येस बॉसला सर्वोत्कृष्ट अभिनेता (खान), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चावला) आणि सर्वोत्कृष्ट खलनायक (पंचोली) असे ६ नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक ("मैं कोई ऐसा गीत गाव" साठी अभिजीत भट्टाचार्य ) जिंकला.
येस बॉस (चित्रपट)
यामागील विज्ञान आणि इतिहास.