मोर्णा नदी किंवा मोरणा नदी किंवा मोरना नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या अकोला, बुलढाणा या जिल्हामधून वाहते. मोर्णा नदीचे उगम स्थान हे पातूर आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील अंदुरा या गावी पूर्णा नदी सोबत मोर्णा नदीचा संगम होतो. या ठिकाणाला मेळ असे म्हणतात तेथे शिव शंकराचे पुरातन मंदिर आहे.
अकोला शहरातून जाणाऱ्या ८ किमी लांबीच्या मोरणा नदीच्या प्रवाहाची स्वच्छता करण्यासाठी मोरणा स्वच्छ अभियान सुरू करण्यात आले. अकोला जिल्हाधिकारी श्री. पांडे यांनी याची सुरुवात केली आणि हजारो नागरिक, स्वयंसेवी संस्था, सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. जून २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये या स्वच्छता मोहिमेबद्दल उल्लेख केला.
मोर्णा नदी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.