मोरेलोस

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मोरेलोस

मोरेलोस (संपूर्ण नाव: मोरेलोसचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Morelos) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या दक्षिण भागात स्थित असून

ते क्षेत्रफळानुसार देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान तर लोकसंख्येनुसार २३व्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील लोकसंख्या घनता मेक्सिकोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्वेर्नाव्हाका ही मोरेलोस राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

येथील हवामान उबदार असून येथे मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →