मोन्तेविदेओ (स्पॅनिश: Montevideo; इंग्लिश उच्चारः मॉंटेव्हिडीयो) ही उरुग्वे देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० साली मोन्तेविदेओ शहराची लोकसंख्या १३,३६,८७८ (उरुग्वेच्या ५० टक्के) तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १९,७३,३८० इतकी होती.
मोन्तेविदेओ दक्षिण अमेरिका खंडाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण शहर मानले जाते. १९३० सालामधील पहिल्या फुटबॉल विश्वचषकाचे सर्व सामने मोन्तेविदेओमध्ये भरवण्यात आले होते. तसेच २६ डिसेंबर १९३३ रोजी अमेरिका (खंड)ातील १९ देशांनी मोन्तेविदेओ येथे लष्करी अनाक्रमणाचा करार केला होता. सध्या मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील एक मोठे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. एका अहवालानुसार २००७ साली मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट राहणीमान असलेले शहर होते.
मोन्तेविदेओ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.