मोनिका (जन्म नाव: रेखा मारुतिराज) ही एक भारतीय माजी अभिनेत्री आहे, जिने प्रामुख्याने तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करणारी मोनिका बहुतेकदा सहाय्यक भूमिकांमध्ये दिसली. २००० च्या दशकाच्या उत्तरार्धात तिने मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली. ती अजाघी, इमसाई अरसन २३ पुलिकेसी आणि सिलंधी या तमिळ भाषेतील चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
२०१२ मध्ये, तिने मल्याळम चित्रपटात काम करतेवेळी तिचे नाव बदलून परवाना असे ठेवले. २०१४ मध्ये, तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव बदलून एमजी रहिमा असे ठेवले. याच सोबत तिने अभिनय सोडल्याची घोषणा देखील केली.
३० मे २०१४ रोजी, इस्लाम धर्म स्वीकारताना मोनिकाने तिचे नवीन नाव एमजी रहीमा असे ठेवले. ज्यात एम म्हणजे मारुती राज (वडील) आणि जी म्हणजे ग्रेसी (आई) असे लघुरूप घेतल्या गेले. मोनिकाचे वडील हिंदू आहेत आणि आई ख्रिश्चन आहे.
रहिमाने चेन्नई येथील उद्योजक मलिकशी लग्न केले, जो मूळचा सेलमचा आहे. मलिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात आणि निर्यातीचा व्यवसाय करतो.
मोनिका (अभिनेत्री)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.