मॉरिस हा १९८७ चा जेम्स आयव्हरी दिग्दर्शित ब्रिटिश प्रणय-नाट्य चित्रपट आहे, जो ई.एम. फोर्स्टरच्या १९७१ मधीलमॉरिस या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात मॉरिसच्या भूमिकेत जेम्स विल्बी, क्लाइव्हच्या भूमिकेत ह्यू ग्रांट आणि ॲलेकच्या भूमिकेत रूपर्ट ग्रेव्हज आहेत. सहाय्यक कलाकारांमध्ये डेनहोम इलियट, सायमन कॅलो, बिली व्हाइटलॉ आणि बेन किंग्जली यांचा समावेश आहे.
मर्चंट आयव्हरी प्रॉडक्शन आणि फिल्म फोर इंटरनॅशनल द्वारे इस्माईल मर्चंटने या चित्रपटाची निर्मिती केली होती, जेम्स आयव्हरी आणि किट हेस्केथ-हार्वे यांनी पटकथा लिहिले होती व पियरे ल्होम यांनी छायाचित्रण केले होते. ही एडवर्डियन इंग्लंडच्या प्रतिबंधात्मक आणि दडपशाही संस्कृतीतील समलिंगी प्रेमाची कथा आहे. कथेचे मुख्य पात्र, मॉरिस हॉल हा युनिव्हर्सिटीत शिकतो व गोंधळलेले नातेसंबंधात आहे जो समाजात आपल्याला बसवण्यासाठी धडपडत आहे आणि शेवटी त्याच्या आयुष्याच्या जोडीदाराशी एकत्र येतो.
१९८७ मध्ये व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता, जिथे आयव्हरीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सिल्व्हर लायन पुरस्कार देण्यात आला होता, जो पुरस्कार एरमानो ओल्मीसह सामायिक करण्यात आला होता. जेम्स विल्बी आणि ह्यू ग्रँट यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आणि रिचर्ड रॉबिन्स यांना त्यांच्या संगीतासाठी पारितोषिक मिळाले. न्यू यॉर्क शहरात हा चित्रपट उघडला तेव्हा त्याला अनुकूल पुनरावलोकने मिळाली. मॉरिसला सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइन श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार नामांकन मिळाले.
मॉरिस (१९८७ चित्रपट)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?