फोर वेडिंग्ज अँड अ फ्यूनरल हा १९९४ चा माइक नेवेल दिग्दर्शित ब्रिटिश हास्त-प्रणय चित्रपट आहे. पटकथालेखक रिचर्ड कर्टिसच्या अनेक चित्रपटांपैकी हा पहिला चित्रपट आहे ज्यात ह्यू ग्रँटची भूमिका आहे. चार्ल्स (ग्रँट) आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या अनेक सामाजिक प्रसंगांवर हे कथानक आहे. क्रिस्टिन स्कॉट थॉमस, जेम्स फ्लीट, सायमन कॅलो, जॉन हॅना, शार्लोट कोलमन, डेव्हिड बॉवर, कॉरिन रेडग्रेव्ह, आणि रोवन ॲटकिन्सन आणि अँडी मॅकडोवेल हे सह-कलाकार आहेत.
हा चित्रपट सहा आठवड्यांत तयार करण्यात आला, व त्याची किंमत £३ दशलक्ष पेक्षा कमी होती. हा एक अनपेक्षित यश आणि त्यावेळच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा ब्रिटिश चित्रपट बनला व जगभरात बॉक्स ऑफिसवर एकूण $२४५.७. दशलक्ष मिळवले. ह्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेसाठी ऑस्कर पुरस्कार नामांकन प्राप्त झाले. याव्यतिरिक्त, ग्रँटने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार जिंकला. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (स्कॉट थॉमस) बाफ्टा पुरस्कार जिंकला. चित्रपटाच्या यशाने ह्यू ग्रँटला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली; विशेषतः अमेरिकेमध्ये .
१९९९ मध्ये, ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूटच्या "२० व्या शतकातील १०० महान ब्रिटीश चित्रपट" या मध्ये चित्रपटाला २३ वे स्थान देण्यात आले. २०१६ मध्ये, एम्पायर मासिकाने "१०० सर्वोत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट" या यादीत त्याला २१ वे स्थानावर दिले. २०१७ मधील टाइम आउट मासिकाच्या सर्वेक्षणासाठी १५० अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, निर्माते आणि समीक्षकांच्या याला आतापर्यंतचा ७४वा सर्वोत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट मानला होता.
फोर वेडिंग्ज अँड अ फ्युनरल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.