मेघालयचे मुख्यमंत्री

या विषयावर तज्ञ बना.

मेघालयचे मुख्यमंत्री

मेघालयचा मुख्यमंत्री हा भारताच्या मेघालय राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व मेघालयच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ मेघालय राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.

१९७० सालापासून एकूण १२ व्यक्ती मेघालयच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत ज्यापैकी ६ मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. नॅशनल पीपल्स पार्टीचे कॉनराड संगमा हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →