मेंढी पालन

या विषयावर तज्ञ बना.

मेंढी पालन

मेंढी पालन हे मेंढ्या पाळून त्यांची लोकर, कातडे व मांस विकण्याचा व्यवसाय आहे. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू, तेलंगणा तसेच मध्जयप्रदेश या राज्यांतील धनगर ही आदिम भटकी जमात हा मेंढी पालन व्यवसाय करते म्हणून त्यांना मेंढपाळ म्हणून ओळखले जाते. या व्यवसायाकरिता जास्त जमीन लागत नाही. हा व्यवसाय एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. फार थोडी गुंतवणूक करून मेंढी पालन हा किरकोळ, लहान शेतकऱ्यासाठी आणि भूमिहीन श्रमिकांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो. जगातील अनेक देशांत हा व्यवसाय प्रचंड मोठ्या विस्तारातील जमिनीवर केला जातो. भारताशिवाय न्यू झीलँड, अमेरिका, मध्य आशिया आणि आर्जेन्टिनामध्ये हा व्यवसाय केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →