मॅजेस्टिक प्रकाशन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मराठी पुस्तके छापून वितरित करणाऱ्या अनेक मराठी प्रकाशन संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी मॅजेस्टिक प्रकाशन ही एक प्रमुख प्रकाशन संस्था आहे.

आंतरजाल दुवा- http://majesticprakashan.com/ Archived 2008-04-01 at the वेबॅक मशीन. ठाणे: न्यू इंग्लिश स्कूल समोर, राम मारूती रोड, ठाणे ४००६०२ फोनः२५३७६८६५

संस्थापक केशवराव कोठावळे यांनी १९४२ मध्ये मॅजेस्टिक या नावाखाली पुस्तकविक्रीला सुरुवात केली. १९४८ मध्ये प्रकाशनाला प्रारंभ झाला तरी मॅजेस्टिक प्रकाशनची स्थापना १९५२ मध्ये झाली. मराठीतील उत्तमोत्तम व मान्यवर साहित्यकारांचे लेखन मॅजेस्टिकने प्रकाशित केले आहे. ग्रंथप्रेमाला वाहिलेले ललित मासिक व दीपावली हे वार्षिक त्यांचेच. १९८३ पासून पुण्यात व १९८४ पासून मुंबईतील पार्ल्यात सुरू झालेल्या मॅजेस्टिक गप्पा अतिशय लोकप्रिय आहेत. मॅजेस्टिकने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या १,५०० च्या वर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →