मॅक्वेरी बेट

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मॅक्वेरी बेट

मॅक्वेरी बेट हे नैऋत्य प्रशांत महासागरातील एक उपअंटार्क्टिक बेट आहे. हे न्यू झीलंड पासून अंटार्क्टिकाच्या साधारण मध्यात आहे. १८८० पासून ते ऑस्ट्रेलियातील टास्मानियाचा एक भाग आहे. १९७८ मध्ये या बेटाला टास्मानियन राज्य राखीव प्रदेश जाहीर केले गेले आणि १९९७ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवले गेले.



मॅक्वेरी बेट हे ऑस्ट्रेलियन प्लेट आणि पॅसिफिक प्लेट यांच्या सीमारेषेवर आहे आणि त्यामुळे तयार झालेल्या समुद्राखालील पर्वतरांगेचा पाण्याच्या वरचा भाग आहे.

या बेटावर त्यांच्या वार्षिक घरट्याच्या हंगामात जगातील सगळे शाही पेंग्विन येथे येतात. याशिवाय येथे अनेक प्रकारची जैवविविधता आढळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →