मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मॅक ओएस एक्स १०.६ (सांकेतिक नाव स्नो लेपर्ड) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची सातवी महत्त्वाची आवृत्ती आहे. ती मॅक ओएस एक्स लेपर्डची उत्तराधिकारी असून मॅक ओएस एक्स लायनची पूर्वाधिकारी आहे.

स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत २९ अमेरिकन डॉलर आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. मॅक ओएस एक्स लेपर्डच्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.

मॅक ओएस एक्स लायन ही ओएस मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डनंतर प्रकाशित झाली. तिचे प्रकाशन जुलै २०, २०११ रोजी झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →