मृगया हा १९७६ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन नाट्य चित्रपट आहे जो मृणाल सेन दिग्दर्शित आणि के. राजेश्वर राव निर्मित आहे. भागवती चरण पाणिग्रही यांच्या शिकार या ओडिया लघुकथेवर हा आधारित आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि ममता शंकर यांची भूमिका आहे; व दोघेही या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
चित्रपटाचे संगीत सलील चौधरी यांनी दिले होते, तर के.के. महाजन यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली होती. २४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, मृगयाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि मिथुन चक्रवर्तीला सर्वोत्कृष्ट अभिनेता असे दोन पुरस्कार मिळाले. १९७७ मध्ये १० व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण पुरस्कारासाठी नामांकन मिळण्याव्यतिरिक्त, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेर समीक्षक पुरस्कार देखील मिळाला.
मृगया
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.