डॉ. महंमद युनूस (२८ जून, इ.स. १९४०:चट्टग्राम, बांगलादेश - ) हे बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे संस्थापक आहेत. सन २००६ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. महंमद युनूस हे बँकर टू द पुअर या ग्रंथाचे लेखक आहेत.
आईवडिलांच्या नऊ अपत्यापैकी तिसरे अपत्य असलेल्या युनुस ह्यांनी अर्थशास्त्र ह्या विषयात ढाका विद्यापीठातून बी.ए.आणि एम.ए.केले.काही वर्षे ढाका विद्यापीठात अध्यापन केले.फुलब्राईट शिष्यवृत्तीद्वारे व्हंडरबिल्ट युनिव्हर्सिटीतून पीएच.डी.केली. काही काळ तिथे अद्यापन केले.साल १९७२ मध्ये ते चितगाव विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख झाले.
ऑगस्ट २०२४मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात पळ काढल्यावर युनूस यांनी मुख्य सल्लागार या नात्याने देशाचा कारभार पाहिला.
मुहम्मद युनूस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.