मुर्मान्स्क (रशियन: Му́рманск) हे रशिया देशाच्या मुर्मान्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. मुर्मान्स्क शहर रशियाच्या वायव्य कोपऱ्यात बारेंट्स समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते रशियाचे एक महत्त्वाचे बंदर आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेले मुर्मान्स्क आर्क्टिक वर्तुळाच्या उत्तरेला वसलेले जगातील सर्वात मोठे शहर आहे.
मुर्मान्स्क शहर रशियन साम्राज्याने इ.स. १९१५ साली पहिल्या महायुद्धादरम्यान वसवले होते. सध्या येथील लोकसंख्या झपाट्याने घटत आहे.
मुर्मान्स्क
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.