मुद्रा हा एक प्रतीकात्मक किंवा धार्मिक प्रकारचा हावभाव आहे. विशेषतः हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात याचा वापर दिसून येतो. बहुतेक मुद्रा ह्या हात आणि बोटांच्या सहाय्याने केल्या जातात. तर काही मुद्रांमध्ये संपूर्ण शरीराचा समावेश असतो.
भारतीय धर्मातील मूर्तिशास्त्र आणि आध्यात्मिक अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या आध्यात्मिक हावभावांसोबतच, मुद्रांचा भारतीय नृत्य आणि योगाच्या अनेक प्रकारांमध्ये वापर केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आणि धर्मात वापरल्या जाणाऱ्या मुद्रांची श्रेणी वेगवेगळी असते. अर्थातच काही प्रमाणात त्यात साम्य देखील दिसून येते. याव्यतिरिक्त, अनेक बौद्ध मुद्रा दक्षिण आशियाच्या बाहेर वापरल्या जातात. तर जगात इतरत्र याची वेगवेगळी स्थानिक रूपे विकसित झाली आहेत.
हठ योगामध्ये, मुद्रा ह्या प्राणायाम करतेवेळी करण्यात येतात. या मुद्रा सामान्यतः बसलेल्या स्थितीत केल्या जातात. श्वासोच्छवास आणि प्राणाच्या प्रवाहावर अचूक नियंत्रण करण्यासाठी या मुद्रा केल्या जातात. तसेच मुद्रा केल्याने शरीराच्या वेगवेगळ्या भागांना उत्तेजना किंवा जागृती येते. या मुद्रा शरीरातील बिंदू, बोधचित्त, अमृत किंवा चेतनेशी संबंधित काम करतात. हठयोगिक मुद्रा ही सामान्यतः एक अंतर्गत क्रिया असते, ज्यामध्ये पेल्विक फ्लोर, डायाफ्राम, घसा, डोळे, जीभ, गुदद्वार, गुप्तांग, पोट आणि शरीराचे इतर भाग समाविष्ट असतात. मुद्रांची काही विविध उदाहरणे म्हणजे मुलबंध, महामुद्रा, विपरिता करणी, खेचरी मुद्रा आणि वजरोली मुद्रा होत. अमृतसिद्धीमध्ये त्यांची संख्या ३, तर घेरंद संहितेत २५ पर्यंत आहे. याशिवाय हठयोग प्रदीपिकामध्ये १० मुद्रांचा प्रादुर्भाव आढळतो.
भारतीय उपखंडातील हिंदू आणि बौद्ध कलेच्या मूर्तीशास्त्रात मुद्रा क्रियेचा वापर केला जातो. नाट्य शास्त्र सारख्या धर्मग्रंथांमध्ये मुद्रांचे वर्णन केलेले आढळून येते. ज्यामध्ये २४ असंयुक्त किंवा विभक्त (अर्थात एका हाताने केल्या जाणाऱ्या) आणि १३ संयुक्त (अर्थात दोन्ही हाताने केल्या जाणाऱ्या) मुद्रा आहेत. मुद्रा क्रिया ही सामान्यतः हात आणि बोटांनी तयार केली जाते. योगासन आणि ध्यान क्रियेत स्थिरपणे, तर नाट्यशास्त्रात गतिमानपणे मुद्रांच्या
क्रिया केल्या जातात.
हिंदू आणि बौद्ध मूर्तीशास्त्रात काही मुद्रा एक समान दिसून येतात. काही प्रदेशांमध्ये, उदाहरणार्थ लाओस आणि थायलंडमध्ये, याचे वेगळे प्रकार आढळतात. परंतु त्यांच्यात संबंधित आयकॉनोग्राफिक परंपरा आहेत.
मुद्रा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.