लाओसमधील बौद्ध धर्म

या विषयावर तज्ञ बना.

लाओसमधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म लाओसचा प्राथमिक धर्म आहे. लाओसमध्ये प्रचलित बौद्ध धर्म हा थेरवाद परंपरेचा आहे. लाओ बौद्ध धर्म हा थेरवाद बौद्ध धर्माचे एक अद्वितीय रूप असून तो लाओ संस्कृतीच्या आधारावर आहेत. लाओसमधील बौद्ध धर्मात अनेकदा जवळच्या लोकांच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या विश्वासांबद्दल आणि पूर्वजांच्या विचारांचा विश्वास टिकवून आहेत.

आज लाओसमध्ये बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची संख्या एका अहवालानुसार ९०% आहे. तर सीआयए वर्ल्ड फॅक्टबुकने अंदाज दर्शवला आहे की, एकूण लोकसंख्येच्या ६७% व्यक्ती बौद्ध म्हणून ओळखले जातात. लाओस सरकारमधील बौद्धांच्या संख्येचा अचूक अंदाज तयार करणे हे लाओटियन सरकारद्वारे उपलब्ध केलेल्या माहितीच्या कमतरतेमुळे गुंतागुंतीचे आहे आणि लाओसमध्ये बौद्ध व चैतन्यवादी (जीवात्मवाद) प्रथा यांच्यातील घनिष्ठ संबंध बौद्ध-जीवात्मवादी (बुद्धिस्ट-एनिमिस्ट) या दोन्ही बौद्धधर्माचे अनुयायी ९०% ते ९८% आहेत. येथे चिनी किंवा व्हिएतनामी महायान बौद्धांचीदेखील मोठी संख्या आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →