मुखदुर्गंधी हे पेरिओडोंन्टल रोग तथा पेरिओडोन्टायटिसचे लक्षण असते. दातांच्या हिरड्यांच्या आजारामुळे हे लक्षण दिसते. हा दातांच्या सभोवतालच्या ऊतींवर परिणाम करणाऱ्या दाहक परिस्थितींचा एक रोगसमूह आहे. याच्या सुरुवातीला जिंजिव्हायटिस होते व हिरड्या सुजतात. त्या लाल होउन आणि त्यांतून रक्त येऊ शकते. जगभरातील प्रौढांमध्ये दात गमावण्याचे हे मुख्य कारण मानले जाते. याच्या पेरिओडोंटायटिस या अधिक गंभीर स्वरूपात दात हिरड्यांतून गळून पडू शकतात तसेच जबड्याच्या हाडांचे नुकसान होऊनही दात ढिले होऊन गळून पडू शकतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुखदुर्गंधी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.