ऑक्सीटॉसिन हे एक सजीवांच्या शरीरात स्त्रवणारे संप्रेरक आहे, जे सामान्यत: हायपोथालेमसमध्ये तयार होते आणि पोस्टरियर पिट्यूटरीद्वारे सोडला जातो. उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून हे संप्रेरक प्राण्यांमध्ये अस्तित्वात आहे. हे मानवांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावते ज्यात सामाजिक बंधन, प्रेम, पुनरुत्पादन, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरचा कालावधी यांचा समावेश होतो. ऑक्सिटोसिन लैंगिक क्रिया आणि बाळंतपणाच्या प्रतिसादात संप्रेरक म्हणून रक्तप्रवाहात सोडले जाते. हे मादीच्या शरीरात दुध निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संप्रेरक आहे.
कोणत्याही प्रकारचा तणाव व चिंतापासून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती बरोबर वेळ घातला; विशेष म्हणजे विनोद ऐकला अथवा सांगितला असता ऑक्सिटोसिनची पातळी वाढते. हे संप्रेरक हायपोथालेमसमध्ये तयार होते व पिट्यूटरी ग्रंथीद्वारे रक्तामध्ये सोडले जाते. उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तीने डाव्या हाताने, तर डावखुऱ्या व्यक्तीने उजव्या हाताने काम केल्यास किंवा टेबल टेनिस/बॅडमिंटन सारखे खेळले असता देखील फायदा होतो. तणाव आणि नैराश्य घालवण्यासाठी लाफ्टर थेरपी याच करिता उपयुक्त ठरते.
ऑक्सीटॉसिन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.