बॅसिलस सबटिलिस

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बॅसिलस सबटिलिस

बॅसिलस सबटिलिस किंवा ग्रास बॅसिलस हा एक ग्रॅम-पॉझिटिव्ह, कॅटालेस -पॉझिटिव्ह जीवाणू आहे जो माती आणि रवंथ करणारे सजीव, मानव आणि सागरी स्पंजच्या जठरांत्र मार्गात आढळतो. बॅसिलस वंशाच्या इतर जीवाणू प्रमाणेच, हे जीवाणू दंडगोलाकार असतात. तसेच ते एक कठीण, संरक्षणात्मक बीजाणू (एंडोस्पोर) तयार करू शकतात. ज्यामुळे ते अत्यंत प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थिती मध्ये देखील टिकून राहतात. हे जीवाणू सानिल (ज्यांना जगण्यासाठी हवेची आवश्यकता असते) गटात मोडले जातात. तथापि ते अननिल पद्धतीने देखील वाढू शकतात. हा सर्वोत्तम अभ्यासलेला ग्राम-पॉझिटिव्ह जीवाणू मानला जातो. याशिवाय हा जीवाणू गुणसूत्र प्रतिकृती आणि पेशी भिन्नतेचा अभ्यास करण्यासाठी एक आदर्श जीव मानला जातो. स्रावित उत्प्रेरक उत्पादनातील प्रमुख घटकांपैकी हा एक घटक असून या जीवाणूंचा जैवतंत्रज्ञान कंपन्यांद्वारे औद्योगिक स्तरावर वापर केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →