मुकुंद वझे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मुकुंद वझे हे हे एक मराठी लेखक आणि बँक अधिकारी होते. त्‍यांनी बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. वझे यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरुवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणण्यासाठी अशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरुवात केली.

मुकुंद वझे यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या. महाराष्‍ट्र टाइम्‍स आणि लोकसत्ता या दैनिकांमधून त्यांचे लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →