मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ - १८६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मुंबादेवी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २०८ - उमरखाडी, २०९ -डोंगरी, ३१०-खारा तलाव, ३११ - कुंभारवाडा, ३१२ - भुलेश्वर, ४१७-ताडदेव, ५२५- २रा नागपाडा, ५२६ - कामाठीपुरा यांचा समावेश होतो. मुंबादेवी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमिन अमीरअली पटेल हे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.