मुंबईतील रस्त्यावरची खादाडी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मुंबईतील रस्त्यावरची खादाडी

मुंबईत फिरती दुकाने चालवून फेरीवाले आहार विक्री करतात तोच हा मुंबईतील रस्त्यावरील आहार आहे. या शहरातील हे एक विशेष असे नमुनेदार प्रकार आहे. रस्त्यावरील आहार हे या शहराचे एक वेगळेपण आहे. सामान्यतः सर्व भारतभर रस्त्यावर आहार मिळतोच पण मुंबईत सर्व प्रकारची जनता, त्यात गरीब, श्रीमंत, जातिभेद, या गोष्टी बाजूला ठेवून सर्वजण सकाळी, संध्याकाळी रस्त्यावरील आहाराचा आस्वाद घेतात आणि त्याची चव हॉटेलमधील आहारापेक्षा उत्कृष्ट आहे अशी अनुभवाने चर्चा करतात. अगणित मुंबईकराणा रात्रीच्या वेळी रस्त्यावरील आहार घेणे आवडते. मुंबईची जनता त्यावेळी सर्व अडथळे झुगारून जात, धर्म, लिंग, नैतिकता, राग, लोभ, विसरून रस्त्यावरील आहार घेण्यात मश्गुल असते. रस्त्यावरील आहार विक्रेत्यानी खरे तर ही व्यवस्था करून या शहरातील संस्कृतीत बदल घडवीण्यास हातभार लावलेला आहे. मुंबईतील हॉटेलशी तुलना केली तर रस्त्यावरील आहार कमी खर्चिक आहे आणि हे विक्रेते रेल्वे स्थानक, महाविध्यालय, अशा गर्दीच्या ठिकाणीच आहार देण्याची व्यवसाइक काळजी घेतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →