मुंबई सेंट्रल (टर्मिनस) हे मुंबई शहरामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर टर्मिनस,लोकमान्य टिळक टर्मिनस व वांद्रे टर्मिनस सोबत मुंबई सेंट्रल हेही लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणारे एक टर्मिनस आहे.
मुंबई सेंट्रलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यालय व मध्यवर्ती बस स्थानक आहे. येथून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात एसटी बसेस जातात. येथून गोव्यासाठी सुद्धा बस सोडली जाते. बस आरक्षणाची संगणकीय सोय उपलब्ध आहे तसेच माफक दरात उपाहारगृह चालविले जाते. या उपाहारगृहातील बटाटा वडा, झणझणीत नादखुळा कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, गरमागरम कांदा भजी, शुद्ध देशी साजुक तुपात तळलेली गरमागरम जिलेबी आणि शुद्ध रिफाईण्ड तेलात तळलेला अस्सल अहमदाबादी चवीचा फाफडा हे पदार्थ खास वैशिष्ट्य आहे. इथे दिवसाचे २४ तास वर्दळ असते आणि दिवस रात्र बस सेवा चालू असते. मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकाला लागूनच पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय आहे. त्यापुढे मुंबई महानगरपालिकेचे नायर रुग्णालय आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?