मुंबई मॅरेथॉन ही दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी मुंबई, भारत येथे आयोजित केलेली वार्षिक आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन आहे. टाटा समूहाच्या प्रायोजकत्वाच्या कारणास्तव ही टाटा मुंबई मॅरेथॉन म्हणून देखील ओळखली जाते. ही आशियातील सर्वात मोठी मॅरेथॉन तसेच खंडातील सर्वात मोठी जनसहभागी क्रीडा स्पर्धा आहे.
मुंबई मॅरेथॉनमध्ये सहा वेगवेगळ्या शर्यतींच्या श्रेणी आहेत: मॅरेथॉन (४२.१९५ किमी), हाफ मॅरेथॉन (२१.०९७ किमी), ड्रीम रन (६ किमी), ज्येष्ठ नागरिकांची धाव (४.३ किमी), चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी (२.४ किमी) आणि वेळेनुसार १०K.
ह्याची सुरुवात २००४ साली झाली. २०२१ आणि २०२२ मध्ये कोविड-१९ मुळे ही आयोजीत झाली नाही.
मुंबई मॅरॅथॉन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.