मुंजा हा २०२४ चा भारतीय हिंदी भाषेतील विनोदी भय चित्रपट आहे जो आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आहे आणि त्यात अभय वर्मा, शर्वरी वाघ, सत्यराज आणि मोना सिंग यांनी भूमिका केल्या आहेत. मुंजा चे मुख पात्र पूर्णपणे संगणकाने CGI वापरून तयार केले गेले आहे. मॅडॉक फिल्म्स अंतर्गत अमर कौशिक आणि दिनेश विजान निर्मित, हा मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील तिसरा भाग आहे आणि भारतीय लोककथा आणि पौराणिक कथांनी प्रेरित मुंजाच्या आख्यायिकेवर केंद्रित आहे.
मुंजा हा चित्रपट ७ जून २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित झाला, व त्यानंतर त्याला समीक्षकांकडून मिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट स्लीपर हिट ठरला, व त्याने जगभरात १३२.१३ कोटींची कमाई केली, ज्याचा निर्मिती खर्च ₹३० कोटी होता, आणि शेवटी २०२४ मधील आठवा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. ७० व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट विशेष प्रभावांचा पुरस्कार जिंकला.
मुंजा (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.