मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट अॅट नागपूर, अर्थात मिहान (इंग्लिश: Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur, रोमन लिपीतील लघुरूप: MIHAN) हा महाराष्ट्रातील नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा विमानतळ-प्रकल्प आहे. नागपुराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकासप्रकल्पांमधल्या चालू प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडील व पश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे. विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या बोइंग कंपनीची १८.५ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक या प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे.
नागपूरचे भौगोलिक स्थान बघता मुंबईऐवजी विमानांना इंधन भरण्यासाठी नागपूरला विकसित करण्याची कल्पना होती. पुढे विमानांची देखभाल-दुरुस्ती करण्याबाबत विचार होऊ लागला. त्यानंतर मालवाहतूक केंद्र, अर्थात कार्गो हब, विकसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मालवाहतूक केंद्राची उपयुक्ततता वाढावी, म्हणून आता विशेष आर्थिक क्षेत्र आणण्यात आले.
मिहान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.