मिलिंद बोकील

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मिलिंद बोकील

मिलिंद बोकील (जन्मदिनांक १ मे १९६० - हयात) हे मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. मिलिंद बोकील हे बारावीनंतरच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या "छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते.

मिलिंद बोकील यांची पहिली कथा त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी लिहिली. ’पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश‘ ही ती कथा. ती १९८१ मध्ये किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली. ती पुष्कळ गाजली.

मिलिंदे बोकील यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेटसाठीचा ’कातकरी - विकास की विस्थापन?‘ हा प्रबंध महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' या कादंबरीवर 'ग म भ न' ही एकांकिका व नाटक झाले. नंतर तिच्यावरून मिलिंद उके दिग्दर्शित 'हमने जीना सीख लिया' हा हिंदी, व सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा', असे दोन चित्रपट. निघाले.

'समुद्र' या कादंबरीवर आधारित नाटकामधून श्रेया बुगडे प्रथमच रंगभूमीवर आली.

विक्रांत पांडे यांनी 'शाळा' कादंबरीचे इंग्रजी भाषांतर करून प्रकाशित केले आहे. पद्मजा घोरपड़े यांनी 'समुद्र'चे 'समंदर' नावाचे हिंदी भाषांतर केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →