मिलिंद चंपानेरकर

या विषयातील रहस्ये उलगडा.

मिलिंद चंपानेरकर हे एक मुक्त पत्रकार असून मराठी लेखक आहेत.

चंपानेरकर यांनी १९९१ ते २००० या काळात इंडियन एक्सप्रेससाठी पत्रकारिता केली. त्यानंतर मात्र त्यांनी मुक्त पत्रकारिता पत्करली. त्यातून त्यांनी लिहिलेले रिपोर्ताज पद्धतीचे लेख व अनुभव, शाश्वत विकासासाठी या नियतकालिकामधून, तसेच दैनिक महाराष्ट्र टाइम्समधून प्रकाशित झाले आहेत. नक्षलग्रस्त भागांमधलं जनजीवन, आशियातील अल्पसंख्याकांच्या समस्या आणि राजकीय चळवळींचा मागोवा हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. बस्तर व काश्मीर सारख्या अस्वस्थ प्रदेशांमध्ये फिरून तेथील सर्वसामान्य माणसांचे जीवनावर त्यांनी लेखन केलेले आहे. पॅलेस्टाईन प्रश्नासंबंधीच्या आशियाई देशांच्या शांतियात्रेत (२०१२) त्यांचा सहभाग होता.

पाकिस्तान-भारत पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी या संस्थेच्या पुणे शाखेचे ते अध्यक्ष आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →