मिन्स्क (बेलारूशियन: Мінск, Менск, रशियन: Минск, यिडिश/हिब्रू: Minsk ,מינסק) पूर्व युरोपातील बेलारूस देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलारूसच्या मध्य भागात वसलेले मिन्स्क शहर राष्ट्रीय राजधानीसोबत मिन्स्क प्रदेशाची देखील प्रशासकीय राजधानी आहे. इ.स. १५८९ पासून मिन्स्क पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाच्या तर इ.स. १७९३ पासून रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. इ.स. १९१९ ते १९९१ दरम्यान मिन्स्क सोव्हिएत संघामधील बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची राअज्धानी होती.
सध्या मिन्स्क हे एक प्रगत शहर असून स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ हा बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.
मिन्स्क
थोडक्यात पण महत्त्वाचे.