ब्रेस्त (बेलारूशियन: Брэст, रशियन: Брест, यिडिश: בריסק, युक्रेनियन: Брест, पोलिश: Brześć) हे पूर्व युरोपातील बेलारूस देशामधील ब्रेस्त प्रदेशाची राजधानी व मोठे शहर आहे. बेलारूसच्या पश्चिम भागात पोलंड देशाच्या सीमेवर वसलेल्या ब्रेस्त शहराची लोकसंख्या सुमारे ३.३ लाख आहे. मध्य युगीन काळात पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाच्या तर इ.स. १७९३ पासून रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेले ब्रेस्त पहिल्या महायुद्धानंतर पोलंडचा भाग बनले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने ब्रेस्तवर कब्जा मिळवला. युद्ध संपल्यानंतर ब्रेस्त सोव्हिएत संघामधील बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्यामध्ये सामील करण्यात आले.
१९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ब्रेस्त बेलारूस देशाचा भाग आहे.
ब्रेस्त (बेलारूस)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.