मा. रा. लामखडे उर्फ मारुती रामचंद्र लामखडे (१ जून, इ.स. १९४९:बोटा, संगमनेर, महाराष्ट्र - ) हे मराठी लेखक असून ते लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. ते संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. त्यांनी ललित आणि संशोधनपर स्वरूपाची तेरा पुस्तके लिहिली. तमाशा आणि लावणी या त्यांच्या ग्रंथास मे २०१५ मध्ये कवी अनंतफंदी पुरस्कार मिळाला. आदिवासी ठाकर आणि त्यांची लोकगीते - एक अभ्यास या विषयावर डॉ. सु.रा. चुनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एम.फिल. ही पदवी मिळाली.
ग्रामीण साहित्य संमेलन ही साहित्यविषयक नवी संकल्पना आणि त्याची चळवळ लामखडे यांनी सुरू केली. त्यांनी पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन बोटा येथे भरविले. त्यानंतर ग्रामीण साहित्याची चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली. ठाकर या आदिवासी जमातीचा त्यांचा विशेष अभ्यास होता.
मा.रा. लामखडे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.